कुंभोज येथे शिवसेना, जनसुराज्य, भाजप मित्र पक्षांचा जल्लोष, भगव्या ध्वजास पुष्पहार घालून केला आनंदोत्सव
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकणंगले येथे शिंदेगट शिवसेना-भाजपा,जनसुराज्य व मित्र पक्षांच्या वतीने काल हातकणंगले विधानसभेवर भाजप जनसुराज्य मित्र पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल तसेच महाराष्ट्रात भाजप व शिंदे सरकार पुन्हा स्थापन झाल्याबद्दल एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या शिवसेना ध्वजास पुष्पहार घालून तसेच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानण्यात आले.
यावेळी सेना शहर प्रमुख जयकुमार मिसळ,उपशहर प्रमुख प्रमोद हराळे,शाखा प्रमुख विनायक चव्हाण ,युवा सेना अभिषेक कोळी , युवासेना उपशहर प्रमुख अरुण बंडगर, निवास माने, तेजस कोळी, प्रतिक नकाते, अनिल माने, तेजाब तांबोळी ,विजय कोळी ,सचिन शिंदे, मुबारक मुजावर, मनोज खराड़े, योगेश चव्हान, संदेश मिसाळ, विश्वजीत माने कौस्तुभ माळी, मुबारक मुजावर, विश्वजीत माने आदी मान्यवर उपस्थित होते.