भाजपा वतीने गावभाग परिसरात नागरी समस्या सोडविण्या बाबत उपयुक्तांना निवेदन
इचलकरंजी,(प्रतिनिधी):- गावभाग परिसरातील मखतुम दर्गा, राणा प्रताप चौक, स्फूर्ती कॉर्नर, ढोले पाणंद या परिसरातील पावसाळ्यामध्ये महापुराच्या पाण्यामुळे रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. त्याचबरोबर गटारीचे पाणी तुंबून ते रस्त्यावर येवून परिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे, तसेच भागात याची साफसफाई न झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, याबाबतची तक्रार महापालिकेकडे वेळोवेळी करण्यात आलेली होती परंतु आज तागायत नगरपालिकेचे कर्मचारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. तसेच भागातील विद्युत दिवे बंद अवस्थेत असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विद्युत विभागामध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये विद्युत विभागामध्ये दोनच कर्मचारी असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते, त्यामुळे विद्युत विभागाची अवस्था ही बिकट झालेली आहे, तरी आपण वैयक्तिकरित्या लक्ष सदर समस्येबाबत योग्य ती कारवाई करावी आशा आशयाचे निवेदन भाजपा शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वात उपयुक्ताना देण्यात आलेे.
यावळी इचलकरंजी महानगर पालिका उपायुक्त यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याची बैठक बोलावून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी भाजपा सरचिटणीस राजेश राजपुते, सागर कचरे, सचिन कोरे, प्रकाश खारगे, किशोर पाटील, संग्राम लोंढे, आशीष पाटील, अर्जुन पाटील, अनिस म्हालदार, नितीन पडियार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.