बळवंतराव यादव विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव सुरु
पेठवडगाव, (प्रतिनिधी):- येथील बळवंतराव यादव विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला. क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते व विद्यालयाचे माजी विद्यार्थी सायकलिंगपटू प्रतीक संजय पाटील (पेठवडगाव )यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्राचार्य अविनाश पाटील, उपप्राचार्य किरण कोळी,उपमुख्याध्यापिका मनीषा पोळ, पर्यवेक्षक मनोज शिंगे ,संताजी भोसले, पी. बी.पाटील तसेच क्रीडा विभाग प्रमुख यशवंत शेवाळे,संजय जाधव,केतन खटावकर,भीमसेन सनदी,शमीम शेख,महेश पन्हाळकर, श्रेणिक सरडे, अलका पाटील प्रमुख उपस्थित होते. क्रिडा ज्योतीच्या आगमनानंतर विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ ध्रुव धुमाळ या विद्यार्थ्यांने दिली. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य अविनाश पाटील यांनी केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुणे प्रतीक पाटील म्हणाले, विजय,
-पराजय हा एक खेळाचा अविभाज्य घटक आहे. जरी विद्यार्थ्यांना अपयश आले तरी खचून न जाता पुढील स्पर्धेसाठी कसे यश मिळवता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे. जीवनात जरी अनेक संकटे आली तरी त्याला सामोरे जाऊन त्या संकटावर मात करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी पर्यवेक्षक संताजी भोसले व यशवंत शेवाळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आभार पर्यवेक्षक मनोज शिंगे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रशांत भोरे यांनी केले. यावेळी डॉ. श्रीकांत पाटील, प्रियदर्शन पोवार, सूर्यकांत जाधव,राहुल निचिते, राहुल जाधव, विजय मोरे, दिलीप नाईक, सचिन संकपाळ, अशोक पाटील, स्वस्तिक माळी, तानाजी बामणीकर, विजय भोसले, शैलजा पाटील, वैशाली पवार, शुभांगी चव्हाण,प्रशांती बसागरे, प्रज्ञा कुंभार, अश्विनी बंडगर, प्रियंका परीट,स्नेहल पाटील, मानसी बुवा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.