Home Breaking News मानव मुक्तिचा जाहीरनामा म्हणजे संविधान – जगदीश ओहो

मानव मुक्तिचा जाहीरनामा म्हणजे संविधान – जगदीश ओहो

मानव मुक्तिचा जाहीरनामा म्हणजे संविधान – जगदीश ओहोळ

 

 

इचलकरंजी, प्रतिनिधी (विनोद शिंगे) : संविधान हे कोणत्याही जातीची ,धर्माची मालमता नाही.संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे यायला हवं कारणा संविधान हे दुसरे तिसरे काही नसून त्ये मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे.ज्यामध्ये तुमच ,माझं आणि आपल्या पुढच्या पिढीच आणि या देशाच उज्वल भविष्य आहे.असे वक्तव्य सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी केले.ते शाहू महोत्सव अंतर्गत श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे आयोजित संविधान जागर या कार्यक्रमा मध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी विद्यालयाच्या मुख्यध्यापिका सौ.मंजुषा रावळ होत्या.

सौ.रावळ बोलताना म्हणाल्या, संविधान म्हणजे स्त्री पुरुष्याच्या बरोबरीने काम करू शकते म्हणजे संविधान आहे,सर्व जाती धर्मातील विध्यार्थी एकत्र एका शाळे मध्ये शिकू शकतात म्हणजे संविधान आहे,अन्याया विरुद्ध लढू शकता म्हणजे संविधान आहे,तुमचा सर्वांगीण विकास म्हणजे संविधान आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते म्हणाले की, संविधान हे त्यांचं ही रक्षण करत जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांचं पण रक्षण करत जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत.

यावेळी प्रस्तावना शाहू महोत्सवाचे संकल्पक – प्रमुख अरुण कांबळे यांनी केले. याप्रसंगी माजी कस्टम अधीकारी मदन पवार,शाहू महोत्सवाच्या सेक्रेटरी सौ.अक्षरा कांबळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर शिंदे यांनी केले तर आभार उपमुख्यध्यापक डी.वाय.नारायणकर यांनी मानले.