कोल्हापूर येथे व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती सामाजिक अभियानांतर्गत उद्योजक प्रशिक्षण शिबीर संपन्न
हेरले /(प्रतिनिधी):- समर्थ सोशल फाउंडेशन, न्यूट्रीफील हेल्थ प्रा. लि व शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती सामाजिक अभियानांतर्गत उद्योजक प्रशिक्षण शिबीर पार पडले.महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातून सुमारे बाराशे पेक्षा ज्यास्त लोकांनी या शिबिरास नोंदणी करून उपस्थिती दर्शवली.
संस्थेने येणाऱ्या वर्षभरात ५० हजार पेक्षा ज्यास्त लोकांना सामाजिक कार्यातून उद्योजक बनवन्याचा संकल्प केला आहे.या संदर्भाची सविस्तर माहिती संस्थेचे संस्थापक सादिक शेख यांनी केली यावेळी संस्थेमध्ये कार्यरत असलेले अनेक पदाधिकारी यांनीं आपले मनोगत व्यक्त केले.नोकरी, व्यवसायाच्या शोधात असनाऱ्या शेकडो लोकांना त्यातून प्रेरणा मिळाली व त्यांनी एकमताने समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थे सोबत जुडण्याचा निर्णय घेतला.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, संचालक अस्लम शेख यांनी केले. तसेच प्रास्ताविक संचालक सुहास पाटील यांनी तर आभार संचालक व शिवशंभु व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष सागर देसाई याने मानले.
या शिबिरास संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच नव उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.