खंडणीतील आरोपी महेश माळी दोन वर्षासाठी हद्दपार
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- इचलकरंजी शहरातील लिगाडे मळा परिसरात राहणारा खंडणीतील आरोपी महेश माळी याला शिवाजीनगर पोलिसांनी दोन वर्षासाठी कोल्हापूर सांगली जिल्हा हद्दपार केल आहे .अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे महेश माळी यांच्यावर खंडणी बंदूक बाळगणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे याच अनुषंगाने पोलिसांनी महेश माळी यांच्या विरोधात वरिष्ठांकडे दोन वर्षासाठी हद्दपारचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता या प्रस्तावाला आज मान्यत मिळाली महेश माळी याला ताब्यात घेऊन त्याला कर्नाटक येथील चिकोडी पोलीस ठाण्यातील हद्दीमध्ये त्याला सोडण्यात आले आहे महेश माळी याला दोन वर्षासाठी हद्दपार केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होऊ लागले आहेत.