Home कृषी पीक आलं धावून अन् पावसाने गेल वाहून.. ऐन दिवाळीत बळीराजाची दुरावस्था

पीक आलं धावून अन् पावसाने गेल वाहून.. ऐन दिवाळीत बळीराजाची दुरावस्था

पीक आलं धावून अन् पावसाने गेल वाहून.. ऐन दिवाळीत बळीराजाची दुरावस्था

 

 

कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज परिसरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे, भुईमूग, सोयाबीन काढण्याची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस उसंत घेईना, थांबलेली शेतीचे काम पुढे जाईनात, परिणामी ऊसाच्या भरण्या खोळंबले असून मोठ्या प्रमाणात यावेळी शेती पिकांची नुकसान झाल्याचे चित्र कुंभोज सह हातकणंगले तालुक्यात दिसत आहे. परिणामी पीक झोपून दे ना व पाऊस उठून देईना अशी अवस्था झाली आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी भात व सोयाबीन पिके आडवी होऊन ती पाण्याखाली येत आहेत. त्यामुळे काढणीला आलेले भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांना मोड येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील पिकांची ही परिस्थिती आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पिकांना मोड येण्यास सुरुवात झाली आहे.

दररोज दुपारपर्यंत ऊन, दुपारी तीन नंतर विजेच्या कडकडाटसह परतीचा पाऊस अशी जिल्ह्यातील परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

सध्या कुंभोज परिसरात सोयाबीन, भुईमूग काढणीच्या कामाला वेग आला आहे, पण दररोज सायंकाळी वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पीके आडवी पडून पाण्याखाली येऊ लागली आहेत. परिणामी ती कुजून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ४० टक्के नुकसान झाले असून यात भर पडण्याची शक्यता आहे. या नुकसानीचे कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे सुरू करण्याची मागणी होत आहे.

परिणामी यावर्षी बियाणांचे वाढलेले मोठे दर त्याचप्रमाणे पावसाने लावलेली दमदार हजेरी यामुळे शेतामध्ये आलेले उत्पन्न व पावसामुळे झालेल्या नुकसान याचा कुठेही आर्थिक मेळ घालणे शेतकऱ्याला शक्य होणार नाही. परिणामी मजुरांनी वाढवलेली मजुरी, पिकांचे झालेले शेतातील नुकसान, यामुळे सध्या शेतकरी मेटाकुटीला आला असून एक एकर सोयाबीन काढण्यासाठी पाच हजार रुपये व एक पोते मळणीसाठी पाचशे रुपये दर चालू असून शेतकऱ्यांच्या पदरात केवळ शेवटला राहिलेले सोयाबीन ची भूस्खाटच पडेल असे गणित व्यक्त होत आहे. तसेच सोयाबीन पिकाचे अचानक पडलेले दर यामुळे शेतकरी सध्या चिंताग्रस्त बनला आहे.