Home Breaking News डी.वाय.पाटील बी.टेक.ॲग्री आणि बी.एस्सी ॲग्रीचा‘महाराष्ट्र आयकॉन अवार्ड-२०२४’ ने सन्मान

डी.वाय.पाटील बी.टेक.ॲग्री आणि बी.एस्सी ॲग्रीचा‘महाराष्ट्र आयकॉन अवार्ड-२०२४’ ने सन्मान

डी.वाय.पाटील बी.टेक.ॲग्री आणि बी.एस्सी ॲग्रीचा‘महाराष्ट्र आयकॉन अवार्ड-२०२४’ ने सन्मान

कृषी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव

 

 

तळसंदे :-  येथील डॉ.डी.वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बी.टेक.ॲग्री) आणि डॉ. डी. वाय पाटील कृषी महाविद्यालयला (बी. एस्सी ॲग्री) ‘महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड-२०२४’ ने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे संपन्न झालेल्या एका दिमाखदार समारंभात दोन्ही महाविद्यालयाच्यावतीने प्रा. संदीप पाटील यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

 

नाशिक येथील लाइफब्लूम इंडिया या संस्थेकडून कृषी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल दोन्ही महाविद्यालयांचा गौरव करण्यात आला. कृषी विभाग नाशिकचे उपसंचालक आर. जे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅग्रो केअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन भूषण निकम, ध्रुव अॅग्रो इंडस्ट्रीजचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर साळुंखे आणि कार्यक्रमाचे आयोजक लाइफब्लूम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन ललित जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

प्राचार्य डॉ. सुहास पाटील व प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांनी या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व पाठबळ त्याचबरोबर शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाला दिले.

महाराष्ट्रातील कृषी शिक्षणामध्ये अग्रेसर असणारी हि महाविद्यालये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी द्वारे ‘अ ‘ दर्जा प्राप्त आहेत. एमपीएससी, युपीएससी, बँक, परदेश, संशोधन, आयआयटी अशा सर्वच क्षेत्रात महाविद्यालयांचे विद्यार्थ्यानी उत्तुंग कामगिरी केली आहे. ४० पेक्षा अधिक शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांशी सामंजस्य करार(MoU) केले असून विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर ४ सुवर्णपदके आणि पदव्यूत्तर व पीएचडी स्तरावर १८ सुवर्णपदके मिळविली आहेत. ४५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आयआयटी, एनआयटी, नाबार्ड सारख्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतला आहे. ३१ विद्यार्थ्यांनी इस्राईल येथील हिब्रू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय समर प्रोग्राम पूर्ण केला असून ३७ विद्यार्थ्यांनी विविध देशांत पदव्यूत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. दोन्ही महाविद्यालयांनी २११७ पेक्षा अधिक कृषी पदवीधर तयार केले.

डॉ. डी. वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयला ॲग्रोवन बिझनेस एक्सलंस अवार्ड, नॉलेज रिव्ह्यू मॅगझिनचा ‘दि १० बेस्ट ॲग्रीकल्चरल इंस्टीट्युट इन इंडिया’, बिझनेस साईटचा ‘टॉप टेन कंपनीज बियोंड कोविड-१९ इम्पॅक्ट’, ‘नवभारत’ कडून ‘बेस्ट कॉलेज ऑफ डिकेड विच प्रोड्यूस्ड द मोस्ट सक्सेसफुल अल्युमनी एव्हरी इयर’, अ‍ॅग्रोकेअर कृषीमंच, नाशिक कडून कृषी प्रेरणा अवार्डने डॉ. डी. वाय पाटील कृषी महाविद्यालयला ‘बेस्ट अग्रीकल्चर कॉलेज ऑफ महाराष्ट्र, ‘बेस्ट ॲग्रीकल्चरल इंस्टीट्युट ऑफ द इयर’ आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नाशिक: मान्यवरांकडून महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार स्वीकारताना प्रा. संदीप पाटील व विद्यार्थी कु. सिद्धेश बोरस्त्ये.