Home सामाजिक शरद चव्हाण यांची चर्मकार विकास संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड

शरद चव्हाण यांची चर्मकार विकास संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड

शरद चव्हाण यांची चर्मकार विकास संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड

 

 

रत्नागिरी,(प्रतिनिधी):- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती, पंचायत समिती रत्नागिरीचे माजी सदस्य यासह विविध राजकीय, सामाजिक पदावर कार्यरत असणारे शरद काशीनाथ चव्हाण यांची नुकतीच चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नुकताच या संघटनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी निवड सोहळा महुंजे तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष  संजयजी खामकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि संत रविदास महाराज मंदिर महुंजेचे संस्थापक राजाभाऊ जी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मागील अनेक वर्ष विविध सामाजिक प्रश्न आणि त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असणारे समाजकल्याण समितीचे माजी सभापती श्री. शरदजी चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर संपूर्ण कोकण विभागाची जबाबदारी दिली आहे. शरद चव्हाण हे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्तिमत्व असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांच्या माध्यमातून ते कायमस्वरूपी लोकांच्या संपर्कात असतात.त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे ही निवड भविष्यामध्ये सार्थ ठरवतानाच समाजाच्या हिताची घेत समाजाच्या कल्याणासाठी कायम तत्पर असणार आहे, असा विश्वास यावेळी नवनियुक्त कोकण विभागीय अध्यक्ष शरदजी चव्हाण यांनी दिला.त्यांच्या या निवडीबद्दल खंडाळा परिसरातील माजी प्राचार्य शत्रुघ्न लंबे,प्रा.प्रकाश वंजोळे, बाबासाहेब चव्हाण, डॉ.अभय पाटील, विलासराव कोळेकर, सुनील भोजे, संजय शितप, राजेश जाधव आदी सत्कारप्रसंगी उपस्थित होते.