डॉ.रामेश्वरी लोखंडे याना पीएचडी प्रदान

    डॉ.रामेश्वरी लोखंडे याना पीएचडी प्रदान

     

    नवे पारगांव: नवे पारगांव,(ता.हातकणंगले) येथील डॉ.रामेश्वरी अरुण लोखंडे यांनी “अन्वेइलिंग फिचर सिग्निफिकेन्स:ओप्टिमायसिंग टीम स्ट्रॅटेजि विथ परफॉर्मन्स फोरकास्टिंग इन क्रिकेट उसिंग प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स”” या विषयावर पीएचडी पदवी संपादन केली आहे.डॉ रामेश्वरी यानी मुंबई येथील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे उपसंचालक डॉ. आर.एन.आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले.बाह्य परीक्षक म्हणून आयआयटी दिल्ली येथील डॉ.सुमंत्र दत्ता रॉय आणि अंतर्गत परीक्षक म्हणून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. फारूक काझी यांनी योगदान दिले.वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे संचालक सचिन कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पीएचडीचे कार्य संपन्न झाले.डॉ.रामेश्वरी लोखंडे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये ही पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.आहेत.त्यांना त्यांचे वडील निवृत शिक्षक अरुण लोखंडे,चुलते व शिक्षक राजेंद्र लोखंडे यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.सध्या त्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत.डॉ रामेश्वरी यांच्यावरती त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.