Home Breaking News मविआ च्या माध्यमातून किरण माळी यांना योग्य ठिकाणी संधी देऊ- आमदार राजूबाबा...

मविआ च्या माध्यमातून किरण माळी यांना योग्य ठिकाणी संधी देऊ- आमदार राजूबाबा आवळे

मविआ च्या माध्यमातून किरण माळी यांना योग्य ठिकाणी संधी देऊ- आमदार राजूबाबा आवळे

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):- कुंभोज तालुका हातकलंगले येथील महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांचे सामाजिक राजकीय कार्य उल्लेखनीय असून येणाऱ्या काळात नक्कीच काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीची माध्यमातून त्यांना योग्य ठिकाणी संधी दिली जाईल असे गौरव उद्गार आमदार राजू बाबा आवळे यांनी काढले ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी व सूहास माळी यांच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभोज गावच्या सरपंच स्मिता चौगुले ह्या होत्या. यावेळी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा सुरुडकर यांनी फोनवरून किरण माळी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार सतेज बंटी पाटील, आमदार महादेवराव रावजी महाडिक ,माजी आमदार राजू बाबा आवळे, मा खासदार राजू शेट्टी विद्यमान खासदार धैयशील माने, डी सी पाटील , वारणा दुध संघाचे संचालक अरुण पाटील,दलित मित्र अशोकरावजी माने आदी मान्यवरांनी किरण माळी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कुंभोज परिसरातील शंभर पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच यावेळी गावातील अनेक तरुण मंडळे, ग्रामपंचायत कुंभोज, हिंगणगाव, नेज, दुर्गेवाडी ग्रामपंचायत व परिसरातील नागरिकांच्या वतीने किरण माळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते किरण माळी यांचा सत्कार करण्यात आला.