खोची हायस्कूल दहावीचा निकाल 100%
खोची,(भक्ती गायकवाड) :-खोची ता.हातकणंगले येथील खोची हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यामध्ये ९१ टक्के गुण मिळवून साक्षी प्रताप नरुटे हिने प्रथम क्रमांक पटकावला.तर कनुप्रिया प्रवीण वाले व अनुराधा सर्जेराव कोळी यानी (८९ टक्के) गुण मिळवून द्वितीय तर पलक अस्लम शेख हिने (८४ टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.तर क्षितिजा सतीश चव्हाण (८३)टक्के,प्राची प्रकाश पाटील यांनी ( ८१) टक्के गुण मिळविले. त्यांना शाळेचे संस्थापक प्रा.बी.के.चव्हाण,मार्गदर्शक एम.के.चव्हाण,माजी सरपंच अभिजित चव्हाण,मुख्याध्यापक के.एस.माळी,बी.एम.कोळी,जितेंद्र कांबळे,राजवर्धन चव्हाण,प्रतिभा पाटील,प्रज्ञा ढाले,रेखा शेट्टी,राजश्री खोत,सुमन नाईक,रागिनी जाधव,निशा मगदूम यांचे मार्गदर्शन तर उत्तम चव्हाण,मारुती खांडेकर,हिम्मत एटम, लक्ष्मी बाबर यांचे प्रोत्साहन लाभले.या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
फोटो-