दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बहुगुणी शेवगा देऊन सत्कार
कोल्हापूर,(अविनाश शेलार यांस कडून) :-वडणगे तालुका करवीर येथील बीएच पाटील दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने गेली 11 वर्षे सत्कार गुणवंतांचा या उपक्रमांतग्रत गेली सलग आकरा वर्षे अखंडीत दहावीच्या SSC गुणवंत विद्यार्थ्यांचा निकालाच्या दिवशीच प्रत्यक्ष घरांमध्ये जाऊन पालकांसमवेत विद्यार्थाने मिळविलेल्या यशाबद्दल चर्चा करत सर्व कुटूंबीयांचे कौतुक करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत आरोग्य मित्र शेवगा देऊन सहकुटूंब सत्कार केला जातो .
त्यानुसार आज दहावीचा निकाल घोषित झाल्यानंतर वडणगे गावातील देवी पार्वती व ज्योतीर्लींग हायस्कूल तसेच ब्लूमिंग बर्ड् मधील प्रथम तीन क्रमांक मिळवत यश संपादित केलेल्या तसेच गावातील इतर हायस्कूल मध्ये शिक्षण घेत आसलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा आज प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन निकालाच्या दिवशीच सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष श्री युवराज साळोखे सोसायटी चेअरमण अजित जाधव उत्तम देवणे ऋषिकेश ठाणेकर भीमराव तांबडे संभाजी मांगलेकर उत्तम साखळकर बर्ची मिसाळ आशिष जाधव समाधान पाटील रमाकांत माने महेश साखळकर अंकुश कदम साई मुदगल अनिल भालेकर शुभम पाटील पोपट चौगले अक्षय दिंडे ऋषिकेश टिटवे सुशांत देवणे महेश पाटील वैभव पाटील पंडित पोतदार श्रीधर देवणे अवधूत पाटील अमर पाटील इत्यादी सदस्य व पालक उपस्थित होते .