खोची ; चौगुले हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल ९९ टक्के
खोची,(भक्ती गायकवाड ) :- खोची येथील कै.ॲड.प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूलचा दहावी परीक्षेचा SSC Board निकाल ९९ टक्के लागला.सेमी मेडीयममध्ये आर्यन संदीप कांबळे ह्याने ९०.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
संयुजा प्रमोद बाबर व गायत्री नेताजी जाधव यांनी ९०.२० टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रावणी संतोष पाटील हिने ८८.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
मराठी माध्यमात भाग्यश्री दीपक पाटील (८५.८०) टक्के,समीक्षा कृष्णात काटकर (८३.२०) टक्के, हर्षदा शहाजी पाटील (८२) टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे यश संपादन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष ॲड.जयवंत चौगुले,उपाध्यक्ष ए.बी.चौगुले,सचिव ॲड.आशिष चौगुले व मुख्याध्यापक एस.बी.पोवार यांचे प्रोत्साहन लाभले.तर विनोद खोत,प्रकाश कोकाटे,मल्हारी लोखंडे, टि.एन.बाबर,वंदना पवार,सुहासिनी यादव, आश्लेषा पाटील,हेमराज चौधरी,जयश्री चौगुले, ज्योती मुसळे आदीसह सर्व शिक्षक वर्गाचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.