Home Breaking News बळवंतराव यादव विद्यालयाचा 10 वी परिक्षेत सलग 12 व्या वर्षी 100% निकालाची...

बळवंतराव यादव विद्यालयाचा 10 वी परिक्षेत सलग 12 व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम  

बळवंतराव यादव विद्यालयाचा 10 वी परिक्षेत सलग 12 व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम

 

 

पेठवडगाव : येथील बळवंतराव यादव विद्यालयाचा दहावी SSC परीक्षेचा  सेमी व मराठी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला. परीक्षेसाठी ३३८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सलग बाराव्या वर्षी विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळालेले ४१ विद्यार्थी आहेत. ८० ते ८९ टक्क्यापर्यंत ११३ विद्यार्थी तसेच ७० ते ७९ टक्क्यांपर्यंत ७७ विद्यार्थी आहेत.प्रथम श्रेणीत १९४ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १०८ विद्यार्थी व तृतीय श्रेणीत ३६ विद्यार्थी पास झाले आहेत .निकाल असा -सेमी माध्यम प्रथम क्रमांक विभागून अनुष्का दत्तात्रय कुंभार व सृष्टी विनायक पोवार ९६.६०टक्के, द्वितीय राज माणिक पेटकर ९६.४० तृतीय योगिता बाबासो पाटील ९५.८० टक्के तसेच मराठी माध्यमाचा निकाल असा प्राची शरद पाटील ९५ टक्के, अनुष्का कृष्णात पाटील ८९.८० व आदित्य संदीप भोसले ८८.६० टक्के या सर्व विद्यार्थ्यांना माजी पोलीस आयुक्त व संस्थाअध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा विजयादेवी यादव, सचिव विद्याताई पोळ कार्यवाह अभिजीत गायकवाड यांचे प्रोत्साहन तसेच प्राचार्य अविनाश पाटील, उपमुख्याध्यापिका मनिषा पोळ, पर्यवेक्षक मनोज शिंगे व पी. बी. पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांचे मार्गदर्शन मिळाले.