कापशी (शाहूवाडी)च्या सिद्धेश्वर हायस्कूलचा दहावी चा निकाल ९७.५६ टक्के

    कापशी (शाहूवाडी)च्या सिद्धेश्वर हायस्कूलचा दहावी चा निकाल ९७.५६ टक्के

     

    नवे पारगाव : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, कापशी (ता. शाहूवाडी) येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरचा दहावीचा निकाल ९७.५६ टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य दिलीप चरणे यांनी दिली.

    परीक्षेला ४१ विद्यार्थी बसले पैकी ४० उत्तीर्ण झाले. विशेष श्रेणीत १६, प्रथम श्रेणीत १५, द्वितीय श्रेणीत ६ तर पास श्रेणीत ३. प्रथम तीन क्रमांक : कु. प्राची राजाराम कदम (८६.२०), प्रेम राजाराम कदम (८३.८०), कु. प्रांजली प्रकाश चौगुले:रायटर कु.तेजस्विनी संजय चौगुले (८३.६०).

    यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, सीईओ कौस्तुभ गावडे यांची प्रेरणा मिळाली. प्राचार्य दिलीप चरणे, प्रभारी पर्यवेक्षक बाळासाहेब धोंगडे, शिक्षक जावेद अत्तार, प्रा. सुजाता पुरीबुवा, प्रवीण मोरे, महेश पाटील, शिवानी पाटील, गोरख जाधव, प्रा. सतिश रत्नाकर, प्रा. उत्तम शेळके, प्रा. दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.