1999,10 वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात,तब्बल 25 वर्षानंतर एकत्र आले मित्र-मैत्रिणी

    1999,10 वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात,तब्बल 25 वर्षानंतर एकत्र आले मित्र-मैत्रिणी

     

     

     

    पेठ वडगांव,(प्रकाश कांबळे):-हातकणंगले तालुक्यातील वडगाव हायस्कूल वडगावच्या 1999 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा वडगांव येथील हॉटेल जिप्सी मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न पार पडला सुरुवातीला सर्वांनी आपापला परिचय करून दिला त्यामध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्येकाने आपले करियर आपआपल्या क्षेत्रामध्ये मिळवले कोण डॉक्टर, पत्रकार, सिव्हिल इंजिनिअर, फॅशन डिझायनर,शिक्षक, व्यावसायिक नोकरी, शेती अशा क्षेत्रात करिअर केले आहे असे सर्वांनी एकत्र येऊन गप्पागोष्टी करून आनंद उत्सव साजरा केला कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा भूतकाळाच्या शाळेचे जुन्या आठवणी ताज्या झाल्या जाणवली तिथे एक गोष्ट जाणवली ती अशी की जुने पण दुरावलेले स्नेही पुन्हा एकत्र आणण्याचा संकल्प सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष करून दाखवला आभासी मैत्रीतआता अशा मेळाव्याची गरज असल्याचे प्रकर्षाने पुन्हा एकदा भेटल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर कमाली एकीकडे आज फेसबुक इंस्टाग्राम वर नवे मित्र दररोज भेटतात पण दुसरीकडे आपलं बालपण ज्यांच्या सोबत घालवलं त्यांना मात्र आपण विसरत चाललोय आभासी मैत्रीत आता अशा मेळाव्याची खरी गरज प्रकर्षाने जाणवते असे मत सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले दुपारच्या सत्रामध्ये सर्वांनी स्नेह भोजनाचा एकत्र अस्वाद घेतल्यानंतर ज्या शाळा शिकलो त्या वडगाव हायस्कूलच्या प्रांगणात दाखल झाले मग काय 25 वर्षातील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी पुन्हा वडगाव स्कूलच्या वर्गामध्ये जाऊन पुन्हा बेंचवर बसून माजी विद्यार्थी हनमंत पाटील यांना शिक्षक करून त्यांच्याकडून विद्या ज्ञान घेतले शाळेत शिकत असताना ज्या मैदानावर खेळलो त्या मैदानावर फेरफटका मारला या कार्यक्रमासाठी सर्वांनी एकत्र आणण्याचे काम क्रांती टोपकर चंदन सालपे पत्रकार प्रकाश कांबळे यांनी केले त्यांना सर्वांनी साथ दिली त्यामुळे हा स्नेहमेळावा अतिशय आनंदाने संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद चौगुले यांनी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले.