Home Breaking News वाठार मध्ये ” एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी “उपक्रमास प्रचंड प्रतिसाद ; 1...

वाठार मध्ये ” एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी “उपक्रमास प्रचंड प्रतिसाद ; 1 हजार राखी संकलन

वाठार मध्ये ” एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी “उपक्रमास प्रचंड प्रतिसाद ; 1 हजार राखी संकलन

 

 

वाठार,(प्रकाश कांबळे):- देशामध्ये येत्या 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम जपणारा पवित्र सण म्हणजे “रक्षाबंधन” या सणाला बहिण आपल्या भावाला एक पवित्र धागा बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते,व एक भाऊ आपल्या बहिणीच्या आयुष्यभराच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो.पण आपले असे काही सैनिक आहेत जे आपल्या कर्तव्यासाठी घरापासून, कुटुंबापासून आणि समाजापासून दूर सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात.तर असे सैनिक जे या सणापासून वंचित राहतात,त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आज आजी-माजी सैनिक वेल्फर असोसिएशन वाठार यांच्या वतीने ” एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी ” या उपक्रमासाठी वाठार मधील स्वामी विवेकानंद विद्यानिकेतन, वाठार ग्रामपंचायत, उज्वल ध्येय युथ फाऊंडेशन,श्री गणेश पतसंस्था, जगताप इंटरनॅशनल स्कूल,यांनी राखी सुपूर्द केल्या तर वाठार मधील महिलांनी ही आपल्या संरक्षणासाठी अहोरात्र लढणाऱ्या भावांसाठी एक राखी देऊन आपलं कर्तव्य पार पाडले तसेच सैनिकांचे मनोबल उंचावण्याचा छोटासा प्रयत्न करून .आपली एक राखी त्या सीमेवरील भाऊरायासाठीं पाठविण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडत या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच सागर कांबळे, उपसरपंच गजेंद्र माळी सर्व ग्रा प सदस्य, पत्रकार प्रकाश कांबळे, शिवसेनेचे अनिल दबडे,आजी माजी सैनिक वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू चव्हाण, आनंदा देशमुख, शब्बीर हवालदार, आनंदा भोरे, उत्तम शिंदे, पांडुरंग मोरे, अरुण पाटील, अजित गाजी, विलास वाक्से, गणेश माळी, अशोक माने, सलीम पिंजारी श्रीमती मालन एकनाथ कुंभार, सौ आक्काताई देशमुख, सौ वनिता चव्हाण,सौ पूजा वाक्से यांच्या सह गावातील महिला व पुरुष उपस्थित होते. राखी देण्यासाठी आलेल्या सर्व महिलांचे स्वागत अध्यक्ष विष्णू चव्हाण यांनी केले तर सर्वांचे आभार विलास वाक्से यांनी मानले.