अंबप येथे कृष्णाई प्रेमाई फाउंडेशनचे वतीने वृक्षारोपण

    अंबप येथे कृष्णाई प्रेमाई फाउंडेशनचे वतीने वृक्षारोपण

     

     

    पेठ वडगांव, प्रतिनिधी (प्रकाश कांबळे):- वृक्षारोपण ही काळाची गरज आहे त्याचबरोबर वृक्ष लावून त्याच्या संवर्धन करणे हे गरजेचे आहे त्याच बरोबर लावलेली झाडे जगवणे हॆ महत्वाचे असून त्याबाबत सर्वांनी एकजूट होऊन काम करणे आवश्यक असल्याचे मत अंबप येथील कृष्णाई प्रेमाई फाउंडेशन अध्यक्ष सत्यजीत माने यांनी व्यक्त केले फाउंडेशन च्या वतीने राजेंद्र हायस्कूल अंबप येथे वृक्षारोपण करणेत आले. यावेळी शाळेच्या परिसरात 40 वृक्ष लावण्यात आली. यावेळी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री सत्यजित माने,राजेंद्र हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री केकरे सर, जेष्ठ नागरिक संघाचे श्री कृष्णात माने, दिलीप माने, महाराष्ट्र पोलीस विकास माने,पाटील दाजी,ग्रा,पं सदस्य आशिफ मुल्ला, नितिन तोडकर सर,नजीर मुल्ला, भगवान कांबळे, सुशीलकुमार घेवारी, शशिकांत औताडे,अमर माने, सुरेश वाघमोडे, उत्तम माळी तसेच सौ प्रमिला माने, सौ वृषाली माने, प्रणाली माने तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.