Home Breaking News ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये डॉक्टर दिन उत्साहात संपन्न

ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये डॉक्टर दिन उत्साहात संपन्न

ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये डॉक्टर दिन उत्साहात संपन्न

 

 

*पेठ वडगांव,(प्रकाश कांबळे):-पेठ वडगांव येथील ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये वडगाव डॉक्टर दिन उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून हुपरी सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका सुनिता दीदी या होत्या. तसेच वडगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अजित पवार,बी.न्यूजचे पत्रकार अनिल उपाध्ये दै. वाळवा क्रांतीचे पत्रकार मोहन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुनिता दिदी बोलताना म्हणाल्या की जर पेशंटवर उपचार करताना मेडिसिन बरोबर मेडिटेशन शिकवले तर पेशंट लवकर बरे होतील व त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल.

पेठ वडगाव सेंटरच्या शिवाली बहीनजी यांनी विद्यालयाचा परिचय करून दिला व या विद्यालयाचे कार्य पूर्ण जगभर 14 देशामध्ये कसे चालले आहे याची संपूर्ण माहिती सांगितली यानंतर स्वामीजी सेवानंद महाराज यांनीही सर्व डॉक्टर्सना खूप सुंदर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाच तत्वांचे मनोगत या विषयावरती पाच कन्यानी खूप सुंदर नृत्य केले नंतर गीतांजली बहीणची व ज्योती बहीणजी यांनी उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन व तिलक लावून स्वागत केले.

यावेळी प्रमुख उपस्थित डॉक्टर्सना विविध झाडांची रोपे व सुंदर विचार असलेले लॅमिनेशन फोटो भेट देण्यात आले.

विविध जातीची झाडे भेट देण्यासाठी भादोले गावचे ग्रामसेवक अभिजीत पाटील व अनुसपुरा गावच्या ग्रामसेवक नंदित मोरे यांचे  सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी डॉ. हेमंत भारती, डॉ.भंडारी, डॉ.अजित चव्हाण, डॉ. मनोज पाटील,डॉ.वनिता चौगुले,डॉ.प्रियांका शिनगारे,डॉ.अभय यादव, डॉ स्वप्निल यादव,डॉ.एन. के.कुंभार,डॉ.अंजना जाधव,डॉ मनीषा गोंधळी,डॉ.शैलेजा पाटील,डॉ.सुरेखा पाटील डॉ.बाबर, डॉ.सचिन जोशी डॉ.अमोल पाटील, बुवाचे वाठार मेडिकलचे प्रमोद पाटील व सतीश बेलेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शिवाली बहेणजी यांनी केले तर आभार अनिलभाई शहा यांनी मानले.