Home कोल्हापूर जिल्हा हनुमान दूध संस्थेस 32 लाख 88 हजारांचा नफा

हनुमान दूध संस्थेस 32 लाख 88 हजारांचा नफा

हनुमान  दूध संस्थेस 32 लाख 88 हजारांचा नफा

 

नवे पारगाव, (प्रतिनिधी) : पारगांव (ता.हातकणंगले) येथील हनुमान सहकारी दूध संस्थेस 32 लाख 88 हजार रुपयांचा नफा झाला असून संस्थेचा कारभार उत्तम रित्या सुरू आहे तसेच या वर्षी दूध उत्पादकांना

फरकबिलांसाठी 32 लाख तरतूद केली आहे अशी माहिती वारणा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व संस्थेचे अध्यक्ष शहाजीराव पाटील यांनी दिली.

पारगांव येथील हनुमान सहकारी दूध संस्थेची 48 वार्षिक सभा उत्साहाच्या वातावरणात पार पडली यावेळी श्री. पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, हनुमान दूध संस्था परिसरातील नावाजलेली दूध संस्था असून वारणा दूध संघास सर्वात जास्त दूध पुरवठा करणारी संस्था आहे तसेच म्हैस दूधास 8 टक्के व गाय दुधास 6 टक्के फरकबिल देण्यात येणार असून पशू खाद्य रिबेट प्रति पोत्यास दहा रुपये प्रमाणे 61 हजार रुपये, व नोकरांना बक्षीस 8.33 प्रमाणे 85 हजार रुपये, जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना अनुक्रमे पाच हजार, चार हजार,तीन हजार रुपये देण्यात आले.

संस्थेचे प्रतिदिन 3300 लिटर दूध संकलन असून वार्षिक 11 लाख 46 हजार लिटर दूध संकलन आहे. संस्था दूध उत्पादकांना फॅट व एस.एन.एफ वर दर देते.मयत दूध उत्पादकांना 2000 हजार रुपये, जनावरांना 2500 रुपये सानुग्रह अनुदान देणार असून सानुग्रह अनुदान गतवर्षी 74 हजार रुपये वाटप केले आहे. गिरण विभागातून नाममात्र दराने दळप कांडप करुन दिले जात असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.

सचिव कुंडलिक पिंपळकर यांनी नोटीस व अहवाल वाचन केले सभासदांनी सर्व विषय मंजूर केले. वारणा दूध संघाचे दूध संकलन अधिकारी अशोकराव पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एस. वडजे, सी. ए. सुनील नांगावकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस पाटील इंद्रजीत पाटील,उपाध्यक्ष धनाजी पाटील, माजी उपाध्यक्ष सुहास कारंडे, माजी सरपंच अरविंद आ.पाटील ,बाबासाहेब पाटील, शिवाजी सुर्यवंशी, मुराद मुल्ला, संजय कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक राजेंद्र धुमाळ यांनी आभार मानले.