महापुरुषांचे विचार अमलात आणा आणि आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना – डॉ.भा.ल.ठाणगे
वाठार,(प्रकाश कांबळे);-श्री सद्गुरू जंगली महाराज आश्रम व सद्गुरु गरीबदास आराधना धाम ट्रस्ट व डॉ अजय मस्के यांच्या विस्डम फाउंडेशन वाठार यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन व मोफत पुस्तक वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी डॉ भा.ल.ठाणगे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महेश महाराज होते पुढे बोलताना ठाणगे सर यांनी मुलांना जीवनात आपण बाप म्हूणन जगलं पाहिजे तर विध्यार्थी दशेपासून आपण पुढे आपणाला काय करायचे आहे हॆ आताच ठरवलं पाहिजे आणि महापुरुषांचे विचार अमलात आणा आणि आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना असे शेवटी म्हणाले यावेळी प्रा अशोक कोळेकर यांनी करियर विषयक मार्गदर्शन केले तर एस बी नाईक यांनी समुपदेशक विषयी मुलांना मार्गदर्शन केले दिपक शिंदे सर यांनी मुलांना पोलीस भरती विषयी मार्गदर्शन केले पत्रकार प्रकाश कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी कु यशश्री राजाराम पाटील या MPSC परीक्षेमधून महसूल अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच महेश कुंभार, राहुल पोवार, दीपक हिरवे, प्रा अंकुश कुरणे,दयानंद शिवजातक दिलीप भाटे, पोपट महाराज,संकेत मस्के,सर्जेराव गायकवाड, संतोष टोणपे प्रदीप तिवटे,यांच्या सह शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक वर्ग उपस्थित होता. स्वागत व प्रस्ताविक डॉ.अजय मस्के सर यांनी केले आभार सर्जेराव गायकवाड यांनी मानले.