डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियान

    डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियान

     

     

     

    नवे पारगाव : डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे सायबर सुरक्षेमध्ये नावाजलेल्या ‘क्विक हिल फाउंडेशन’ च्या सहकार्याने सायबर क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यापीठाचे विद्यार्थी आणि समाजामध्ये सायबर सुरक्षेबाबत जागृती केली जाणार आहे.

     

    क्विक हिल फाउंडेशन विमाननगर (पुणे) येथील कार्यलयात याबाबत ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ ही कार्यशाळा नुकतीच पार पाडली. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. याच बरोबर ऑनलाइन जीवनात सायबर अपराधांच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे “सायबर सुरक्षा शिक्षण’ हे अपरिहार्य असल्याचे ‘क्विक हिल’चे अजय शिर्के, सुगंधा दाणी, गायत्री पवार यानी यावेळी सांगितले. या कार्यशाळेमध्ये सायबरमुळे सामाजीक जीवनामधील वाढती आव्हाने आणि त्यावरील उपायांची जागृती मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी चेअरपर्सन अनुपमा काटकर उपस्थित होत्या.

     

    विद्यापीठातही ‘सायबर क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. बीसीए व बी-टेक (संगणक शास्त्र व अभियांत्रिकी) विभागातील विद्यार्थी मोहम्मद अली मकडी, सत्यजीत जाधव, अथर्व जोशी, शिवंश उथळे या विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत हे विद्यार्थी विद्यापीठ व परिसरामध्ये अन्य विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सायबर सुरक्षेबाबत जागृती करणार आहेत. याउपक्रमासाठी संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागातील डॉ. वर्षा देसाई समन्वयक आहेत.

     

    संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. संग्राम पाटील यानी हे अभियान सक्षमपणे राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांचे मार्गदर्शन लाभले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.