इंडियन पोलीस मित्र संघटनेकडून
वडगाव पालिकेच्या
महिला सफाई कामगार यांचा सन्मान
पेठ वडगाव : इंडियन पोलीस मित्र भारत हातकणंगले तालुका यांचे वतीने
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन पेठ
वडगांव नगरपरिषदेच्या महिला सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे माजी.खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस मित्र संघटनेचे मुख्य अधिकारी सुरेश राठोड, स्वे.नि.अधिकारी, गुप्तचर विभाग,मुंबई कृष्णदेव गिरी, कोअर कमिटीचे लहू कांबळे, भिमराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेठ वडगाव येथील नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचारी यांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन डी.एस.राठोड फाउंडेशन व मार्शल योगा अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत,हातकणंगले तालुका यांचे वतीने सुमारे आठ्ठाविस महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संघटनेचे प्रविण बेडक्याळे, सुभाष कुंभार, शैलेश आवळे,सुनिल भारमल,गणपती नरुटे, लखन भोरे,सौ.निर्मला परीट,सौ.अनिता पाटील,सौ.माधवी लाड,सौ.नंदा जांभळे,सौ.सलोनी पुजारी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक मोहन शिंदे,संजय पाटील, सौ.सारिका जाधव सौ.कस्तुरी निकम,सौ.लता चौगुले हे होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ.प्रबोधिनी माने यांनी केले.