खोची हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
खोची,(भक्ती गायकवाड):- खोची हायस्कूल येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव बाजार समितीचे माजी संचालक एम.के.चव्हाण होते. कार्यक्रमास शाळेचे संस्थापक बी.के.चव्हाण सर शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी आठवीच्या विद्यार्थिनीनी विविध महनीय व्यक्तींच्या वेशभूषाचे सादरीकरण करुन त्या व्यक्तीच्या माहितीचे.इंग्रजीमध्ये सादरीकरण केले.
शाळेच्या शिक्षिका निशा मगदूम यांनी या सादरीकरणाचे खूप छान नियोजन केले.यावेळी बी.के. प्रतिभा पाटील रेखा शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक के.एस.माळी यांनी महिला शिक्षिका याना भेटवस्तूचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एम. कोळी यांनी केले.शेवटी आभार जे.आर.कांबळे यांनी आभार मानले.यावेळी प्रज्ञा ढाले,सुमन नाईक,रागिणी जाधव,लक्ष्मी बाबर आदी उपस्थित होते.