वडगावात रमजान ईद उत्साहात साजरी
पेठ वडगाव : येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहाने व आनंदी वातावरणात साजरी केली. रमजान ईदच्या निमित्ताने सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पेठ वडगाव शहरातील इदगाह मैदान येथे मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र येऊन सामुहिक नमाज अदा केली.
उपवासाच्या माध्यमातून महिनाभर अल्लाहची साधना केल्यानंतर आलेले आनंदाचे पर्व. हातकणंगले तालुक्यात ठिकठिकाणी ईदचा सण हा आनंद, उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय नेतेमंडळींपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी ईदच्या या पर्वात सहभागी होत मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यासह मुस्लीम बांधवांनीही ईदची दुआ करताना सर्वांना सुख समाधाना मिळण्यासह सलोख्यात वाढ व्हावी, अशी दुआ अल्लाहकडे मागितली.
यावेळी माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगरसेवक सुनिल हुक्केरी,जवाहर सलगर,
संदीप पाटील,अजय थोरात,शरद पाटील, रमेश शिंपणेकर,रंगराव बावडेकर, रमेश दाभाडे,प्रकाश बुचडे, युवक काँग्रेसचे सुरज जमादार,संजय सुर्यंवशी, नितीन दिंडे,सिराज जमादार, तय्यब कुरेशी,बारुद महालदार,राजू कवठेकर यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांची भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.