ईगल फौंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन..
ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव
मुंबई,(प्रतिनिधी):- ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे यासाठी पुरस्कार प्रस्ताव दि.३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाठवण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता व अन्य पुरस्कारांचाही सामावेश आहे महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , क्रीडा,सरपंच, राजकीय , प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता (इलेक्ट्रॉनिक, प्रिंट,पोर्टल) आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. पुरस्कार माहिती प्रस्ताव आपण पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता.पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी 5 ते 7) या वेळेत संपर्क साधावा . ईगल फौंडेशन चे पदाधिकारी सर्वश्री प्रा.डॉ.महेश मोटे(उमरगा) ,बाळ तोरसकर( मुंबई,) डॉ.सुनील भावसार (नाशिक), प्रमोद पाटील~ (पालघर),डॉ.अशोकराव ढगे (राहुरी), अशोक शिंदे (इस्लामपूर), भगवान देवकर ( कुरळप), प्रा.विजय कोष्टी (सांगली) विजय जगताप (पुणे), एस.एम.पाटील (अमळनेर), भारत कवितके (मुंबई) राजेंद्र गोसावी व डॉ.प्रकाश माळी (ठाणे), श्री बापुसाहेब कांबळे (नेर्ले) यांचेकडे ही सदर नामांकन प्रवेशिका उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपादिका सौ.शालन कोळेकर उपसंपादक सागर पाटील , शेखर सुर्यवंशी , बाबासाहेब राशिनकर तसेच पदाधिकारी सर्वश्री श्री प्रशांत लाड (चिवे ), योगी राजूनाथ (अहमदनगर), सौ.संगिता शिंदे (सातारा) प्रकाश वंजोळे (खंडाळा), दिपक पोतदार (जयसिंगपूर), संजय गायकवाड (येलूर), राजेश जोष्टे (चिपळूण), तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रतापराव शिंदे,प्रा.किरण जाधव,कुमार गायकवाड, विरभद्र पोतदार, बापुसाहेब हुंबरे, अण्णासाहेब कोळी , बालासाहेब फड, प्रल्हाद साळुंके , रावसाहेब काटकर , संजय नवले अहमदनगर यांचेशीही संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदर सन्मान सोहोळा नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडणार आहे.