जिल्हा स्तरीय योग स्पर्धेमध्ये हेरलेतील गजानन पोतदार यांचा प्रथम क्रमांक
हेरले / (प्रतिनिधी):- गडहिंग्लज येथे २९ सप्टेंबर रोजी जिल्हा स्तरीय योगस्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध वयोगटामधील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धे मध्ये हेरले (ता. हातकणंगले) येथील योगशिक्षक गजानन पोतदार यांनी या स्पर्धेमध्ये ५० ते ६५ वयोगटामध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाने ही स्पर्धा जिंकली. या प्रथम क्रमांकाच्या यशामुळे त्यांची अमरावती येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच हेरले येथील शकील जमादार यांनी२३ ते ४० वयोगटामध्ये सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
गजानन पोतदार हे गेली 20 वर्षे हेरले येथे नियमित योग वर्ग चालवत आहेत, तसेच त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हेरले पंचक्रोशीतील अनेक नागरिकांना लाभ झाला आहे.