राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती सदस्यपदी संदीप पाथरे यांची निवड
कोल्हापूर / (प्रतिनिधी):-नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिये हायस्कूल ज्युनियर कॉलेज मधील क्रीडा शिक्षक संदीप पाथरे यांची राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यावर आधारित शालेय अभ्यासक्रम निर्मिती करिता शारीरिक शिक्षण व निरामयता या विषयाकरीता तज्ञ सदस्यपदी यांची निवड झाली.राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद एनसीईआरटी महाराष्ट्र पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार करण्यात येणार आहे.
इयत्ता तिसरी ते दहावी करिता नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रम निर्मिती करण्यात येत आहे. यामधील शारीरिक शिक्षण व निरामयता या विषयाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.श्री.पाथरे गेली २७ वर्ष क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल या खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. ते कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव व करवीर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री .दत्तात्रय गाडवे ,डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई .शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर व आर.डी.पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.