डी .वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकला
विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत विजेतेपद
तळसंदे : येथील डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक संघाने इंटर डिप्लोमा विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील संघ सहभागी झाले होते.
न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर येथे या स्पर्धा झाल्या. विजयी संघामध्ये तेजस तोडकर, तेजस चव्हाण, शार्दुल जाधव, आयान देसाई, सत्यजित खांडेकर, शुभम सकटे, आदित्य खंबे-पाटील, अक्षद पाटील, यश काटे, ओम केकरे, जयदीप आळवेकर यांचा समावेश आहे. या संघाने उपांत्य सामन्यात संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रेवर विजय मिळवला. तर अंतिम सामन्यात न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर या संघावर २९-२४ गुणफरकाने विजय मिळवत जेतेपद पटकावले. फेब्रुवारी महिन्यात मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी हा संघ खेळणार आहे.
या संघाला डी. वाय.पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस आर पावसकर, जिमखाना विभाग प्रमुख विनोद उथळे, प्रा.रोहित जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर- विभागीय बास्केटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाचे पारितोषिक एनआयटीचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांच्या हस्ते स्वीकारताना विद्यार्थी समवेत मार्गदर्शक विनोद उथळे, प्रा. रोहित जाधव.