वडगाव पोलीस स्टेशन मध्ये महात्मा गांधी यांना अभिवादन
पेठ वडगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 155 वी जयंती वडगाव पोलीस स्टेशन मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली .
अहिंसावादी तत्वज्ञानाचे पुरस्कार करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण देशभरात 2 आक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने वडगाव पोलीस स्टेशन मध्ये म.गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर,भरत पाटील, हेड कॉ. कुंभार मॅडम, हेड कॉ.फारणे मॅडम, शिंदे ,गायकवाड , हेड कॉ. बंदरे, हेड कॉ.सुतार आदी उपस्थित होते.