हातकणंगले तालुका क्रीडा संकुल वडगांव मध्येच व्हावे: सरपंच सचिन कांबळे

    हातकणंगले तालुका क्रीडा संकुल वडगांव मध्येच व्हावे: सरपंच सचिन कांबळे

     

     

    वाठार,प्रतिनिधी (प्रकाश कांबळे):-हातकणंगले तालुका क्रीडा संकुल पेठ वडगांव शहरात व्हावे यासाठी वाठार ग्रामपंचायतीचा ठराव दिला आहे क्रीडा संकुल झाल्यामुळे हातकणंगले तालुक्या तील खेळाडूंना तसेच पेठ वडगांव परिसरातील खेळाडूंना विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी चांगली सोय होणार आहे तसेच क्रीडा संकुलामुळे नवनवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे क्रीडा संकुल होण्यासाठी आंदोलन करावे लागले तरी त्या साठी वाठार ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, गावातील सर्व खेळाडू,ग्रामस्थ यांच्या सह सहभागी होणार असल्याची माहिती सरपंच सचिन कांबळे यांनी दिली यावेळी ग्रा पं सदस्य सुहास पाटील, सुरेश नरके यांनी पेठ वडगांव मध्ये क्रीडा संकुल व्हावे यासाठी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी दिलीप भाटे,सुरेश दबडे,मोहसीन पोवाळे , गब्बर पाटील, शरद चौगुले, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.