Home Breaking News डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पसच्या दोघांची दुबई मध्ये निवड

डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पसच्या दोघांची दुबई मध्ये निवड

डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पसच्या दोघांची दुबई मध्ये निवड

 

 

 

 

 

 

 

नवे पारगाव, प्रतिनिधी) : तळसंदे (ता.हातकणंगले) येथील डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या अभिनंदन अशोक पाटील आणि निलेश अरविंद मगदूम या दोन विद्यार्थ्यांची दुबईस्थित अल फारीस क्रेन्स या कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवड झाली.

 

 

 

 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी अभिनंदन केले व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा व्यक्त केल्या. या निवडीसाठी प्लेसमेंट अधिकारी प्रा.शोएब तांबोळी, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. मनान फरास, रजिस्ट्रार प्रा. पी. एम. भागाजे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील , कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी अभिनंदन केले.