वारणानगर येथील राष्ट्रपती दौऱ्याचे राज्यपालांना आमंत्रण
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे):- मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे नुतन राज्यपाल मा.सी.पी.राधाकृष्णन यांची आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी भेट घेतली.
सोमवार दि.०२ सप्टेंबर २०२४ रोजी वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह,वारणानगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपती मुर्मू जी उपस्थितीत राहणार आहेत.त्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.सी.पी.राधाकृष्णन यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी दिले.यावेळी कु.ईशानी विनय कोरे,जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम उपस्थित होते.