Home Breaking News विष्णू पाटील यांची हात वि.सभा.कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघाच्या उबाठा सेनेच्या विभाग...

विष्णू पाटील यांची हात वि.सभा.कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघाच्या उबाठा सेनेच्या विभाग प्रमुख पदी निवड

विष्णू पाटील यांची हात वि.सभा.कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघाच्या उबाठा सेनेच्या विभाग प्रमुख पदी निवड

 

 

खोची,वार्ताहर :- नानिवळे धरणग्रस्त वसाहत,खोची ता. हातकणंगले येथील विष्णू विजय पाटील यांची हातकणंगले विधानसभा कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख पदी निवड झाली.सदर निवडीचे पत्र विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर,जिल्हाप्रमुख संजय चौगले, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील,संदीप दबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विष्णू पाटील हे गेले अनेक वर्षे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. त्यांनी अनेक आंदोलने,मोर्चे, निवडणुका यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.पक्षाची कामे त्यांनी घरोघरी पोहचवली आहेत.त्यांनी शिवसेनेच्या अंगीकृत संघटना शिवसामर्थ्य सेना तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांची पक्षनिष्ठा व कार्य याची दखल घेऊन सदर पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

फोटो- विष्णू पाटील यांना विभाग प्रमुख पदी नियुक्तीचे पत्र प्रदान करताना संपर्कप्रमुख प्रवीण देसाई, सुजित मिणचेकर,संजय चौगुले व मान्यवर