हातकणगले पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांची तडकाफडकी बदली

    हातकणगले पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांची तडकाफडकी बदली

     

     

    हातकणंगले, प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप ठेवत आज जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तडकाफडकी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे बदली केल्याचे समजते

    रुई ता.हातकणंगले येथील सचिन कांबळे याचा 16 ऑगस्ट रोजी भांडण मिटवण्यासाठी बोलवून घेऊन त्याचा खून केला यामुळे रुई गावामध्ये वातावरण तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले तसेच मयत सचिन कांबळे यांच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयासमोर वरिष्ठांकडे अधिकऱ्यां कडे संबंधित पोलीस अधिकाऱ्याची निलंबनाची मागणी केली होती.

    त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयातून पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे .हातकणंगले पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल माने यांच्याकडे सोपवली आहे.