वडगाव शिंपी समाज आयोजित रक्तदान शिबिरात 50 जनांनी केले रक्तदान
पेठ वडगाव,(प्रतिनिधी) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या संजिवन समाधी सोहळा निमित्त पेठवडगाव शिंपी समाज यांच्या वतिने मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरवात शिंपी समाजाचे उपाध्यक्ष नारायण मुंदाळे आणि प्रथम रक्तदाते शैलेश हावळ यांचे हस्ते संत शारोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
सुरवातीस डिएसी वडगाव अर्बन बॅंकेचे शाखाधिकारी राजेंद्र अतिग्रे, संभाजी माळी , राजू बुरूड, निखील सणगर, जगधीश महादार, यांचेसह सुमारे 45 जनांनी रक्तदान केले.
याप्रसंगी समाजिक कार्यकर्ते विकास आयरेकर यांनी सदिच्छा भेट दिली व युवा मंच व शिंपी समाज्याचे विविध उपक्रमांचे कौतूक करून पत्ररुपी शुभेच्छा दिल्या. सांगली येथील आदर्श बल्ड बॕंक यांनी रक्तसंकलन केले.
याप्रसंगी समाजचे सर्व विश्वस्त युवा मंच चे सदस्य शिंपी समाजाचे सदस्य ,साळी, माळी ,कोष्टी, सणगर,धनगर, जैन ,मराठा समाजाचे प्रतिनीधींनी सदिच्छा भेटी व शुभेच्छा दिल्या.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी सुमित लंगरकर यांनी महत्वाची जबाबदारी सांभाळली. तसेच युवा मंचचे अध्यक्ष नंदकिशोर नाझरे,सुमित खटावकर, प्रतिक उरुणकर,धनंजय गोंदकर, सुरज आंबेकर, स्वप्निल पिसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.