हातकणंगले तालुका गट सचिव सेवक पतसंस्था अध्यक्षपदी हिंदुराव मुळीक,उपाध्यक्षपदी प्रताप सादळे
टोप /(वार्ताहर):- हातकणंगले तालुका गट सचिव सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हिंदुराव धुळा मुळीक, उपाध्यक्षपदी प्रताप नाना सादळे (रा.रांगोळी) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. पी. निप्पे यांनी काम पाहिले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. यावेळी संचालक रफीक जमादार (माणगाव), योगेश चौगुले (लाटवडे), अतुल कदम, (हातकणंगले), गोरखनाथ पाटील (साजणी), प्रविण पाटील, (चिकोडी), पोपट बेडेकर (हेर्ले), संजय सिद्ध (पारगाव), प्रदिप गुरव (खोची), विनोद कांबळे (हिंगणगाव), जिल्हा प्रतिनिधी सिकंदर सुतार, सचिन गोटखिंडे, दिलीप खरात, पावलस कांबळे उपस्थित होते. टोप ग्रामस्थांकडून हिंदुराव मुळीक यांचे अभिनंदन होत आहे.