विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न
हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका आणि यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आलेल्या यश-अपयशा संदर्भात तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झाली.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कशाप्रकारे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावेत, आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच कामाला लागण्यासंदर्भाच्या सूचना तसेच नवीन मतदार नोंदणी आणि शिवसेना सदस्य नोंदणीबाबत देखील महत्वाच्या सूचना या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना केल्या.
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मा. मंत्री व शिवसेना सचिव सुभाष देसाई यांचे देखील मार्गदर्शन लाभले.