आशियाई कुस्ती चँपियनशिप स्पर्धेत 33 किलो वर्गात रोहिणी देवबा हिला सुवर्णपदक
हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-पट्टणकोडोली ता. हातकणंगले नगरीची सुकन्या पै.कु. रोहिणी खानदेव देवबा हिची थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती चँपियनशिप स्पर्धेत 33 किलो वर्गात सुवर्णपदक गोल्डमिडल पटकविल्याबद्दल हत्तीवरून भव्य मिरवणूक व भव्य नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता..
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला
यावेळी हुपरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पतन चौखंडे, वडगाव बाजार समितीचे संचालक धुळा डावरे,धनगर समाजाचे गावडे, सिद्राम भानसे सर, बापू मोठे , भाजपा पट्टणकडोली शहराध्यक्ष राणोजी पुजारी,शिवाजी ओमापुजारी,शंकर भानसे यांसह समस्त धनगर समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.