माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांचेकडून भेंडवडे गावची पूरग्रस्त परिस्थिती पाहणी

     

    माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांचेकडून भेंडवडे गावची पूरग्रस्त परिस्थिती पाहणी

     

     

    हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- भेंडवडे तालुका हातकणंगले येथील वासुदेव गल्लीतील आठ ते दहा कुटुंबाचे पुर परिस्थिती मुळे अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. आज भेंडवडे येथील पूर परिस्थिती पाणी माजी आमदार व गोकुळ संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंणचेकर तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माझी शिक्षण सभापती प्रवीण यादव, माजी सरपंच महावीर कांबळे, युवा नेते अमोल निकम, यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच स्थलांतरित नागरिकांना आवश्यक असणारा मदत शासकीय यंत्रणेद्वारे तसेच आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर फाउंडेशन द्वारे पुरवली जाईल असे आश्वासन माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांनी दिले.

    नांगरे गल्ली पाटील गल्ली हूजरे मळा कोळी मळा चव्हाण व निकम मळा परिसरातील नागरिकांना वारणा नदीला आलेल्या पुरामुळे स्थलांतरित करण्यात आले असून, भेंडवडे येथील शासकीय रुग्णालयात वारणा नदीचे पाणी घुसल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी भेंडवडे ग्रामपंचायतीला वारना नदीच्या पुराच्या पाण्याने विळखा घातला असून लवकरच पावसाचे प्रमाण न थांबल्यास वारणा नदीच्या पाण्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, भेंडवडे गावात पुराचे पाणी घुसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2019 नंतर पुन्हा एकदा भेंडवडे गावला महापुराचा धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांच्यातून बोलले जात असून सदर नदी पात्राच्या शेजारी असणाऱ्या सर्वच लोकवस्ती ग्रामपंचायत व प्रशासनाने हलवली असून सदर परिसरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे .

    परिणामी हळूहळू अनेक लोकांनी आपली स्थलांतर सरकारी शाळा परिसरात करण्यास सुरुवात केली असून ग्रामपंचायत प्रशासन पुरावरर्ती नियंत्रण ठेवून असल्याचे दिसत आहे.