विशालची वेबसिनेमात गरुड झेप
सोलापूर ,(प्रतिनिधी):- करमाळा तालुक्यातील विशाल पाटमास या कलाकाराची अश्वयुग टीव्ही च्या भक्तिप्रेम या वेबसिनेमात Web Cinema प्रमुख भूमिकेसाठी निवड करण्यात अली आहे.
गरीब कुटुंबात जन्मलेल्या विशालने दहावी नंतर भेटेल ते काम करून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण तरीही पाहिजे तशी नोकरी त्याला मिळाली नाही म्हणून माघील वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात यायचे ठरवले आणि महाराष्ट्रभर नावाजलेले पुणे जिल्यातील शिरूर येथील नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिटयूटमध्ये Natraj Kohinoor dreams Academy of Institute अभिनयाचे प्रशिक्षण त्याने पूर्ण केले. कोर्स पूर्ण केल्यानंतर मुंबईमध्ये 2-3 महिने सिरीयलला सहकलाकार म्हणून अभिनय केला. तसेच पार्ट टाइम मिसळ हाऊस सुरु केले . हे करत असतानाच आज पर्यन्त टी सिरीजसाठी अल्बम , चित्रपट , सह्याद्रीसाठी मालिका इत्यादी ला दिग्दर्शन केलेले आणि सध्या खासदार निलेशजी लंके MP Nilesh lanke यांच्या जीवनावर आधारित ” आखाडा ” चित्रपटाचे दिग्दर्शन करत असलेले तसेच ऑक्टोबर 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणाऱ्या ” निळावंती एक रहस्य ” या चित्रपटाचे लेखक , दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे यांच्या सध्या सुरु होत असलेल्या ” भक्तिप्रेम ” या मराठी वेबसिनेमात त्यांनी विशालची मुख्य भूमिकेसाठी निवड केली. हा सिनेमा 10 टक्के वारीमध्ये चित्रित होणार असून या चित्रपटात 1 ते 2 गाणेही पहायला मिळणार आहे . तसेच हा सिनेमा ऑगस्टमध्ये सर्वांच्या भेटीला येईल.
करमाळ्याचा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा सिनेमात मुख्य भूमिका करत असल्यामुळे त्याच्या नातेवाईक, मित्रमंडळींकडून कौतुक होत आहे.