वाठार येथे MJ चषक क्रिकेट स्पर्धा उदघाटन सोहळा उत्साहात
वाठार,प्रतिनिधी (प्रकाश कांबळे) : वाठार (ता.हातकणंगले) येथे अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित भव्य ओपन रबर बॉल क्रिकेट स्पर्धा MJ चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेचा उदघाटन सोहळा दलितमित्र अशोकराव माने बापू यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी चषकाचे अनावरण प्रसिद्ध क्रिकेटपटू किरण पावले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी क्रिकेटपटू किरण खतकर, शास्त्रीनगर क्रिकेट क्लबचे काका पाटील, वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, मुख्य आयोजक महेश जगताप,माजी सरपंच नारायण कुंभार, बी.एस. पाटील, गोरख शिंदे, अश्वमेध स्पोर्ट्सचे अमोल लट्ठे, अविनाश दबडे, अनिल सावंत, राहुल दबडे,संतोष माळी, गुणवंत शिंदे, सूरज चौगुले, अभिजित चव्हाण राजाराम शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू शिंदे यांनी केले तर आभार अमोल लट्ठे यांनी मानले .