Home Breaking News अखेर एसटी बस सेवा सुरू ; या गावात केले जंगी स्वागत…

अखेर एसटी बस सेवा सुरू ; या गावात केले जंगी स्वागत…

अखेर एसटी बस सेवा सुरू ; या गावात केले जंगी स्वागत…

 

 

कोल्हापूर, : कोरोना काळात अनेक गावांच्या एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या होत्या. यामध्ये पन्हाळा तालुक्यांतील मलकापूर ,चरण,थेरगाव,सावर्डे, सातवे,मोहरे, वडगांव या मार्गावरील एसटी बंद झाली ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करत बच्चे सावर्डे गावातील एसटी सेवेसाठी कायम प्रयत्नशील असलेले बच्चे सावर्डे चे माजी डे.सरपंच भारत यादव(आप्पा) यांच्या प्रयत्नामुळे अखेर मलकापूर, चरण,थेरगाव,सावर्डे,सातवे, मोहरे,वडगांव बस सेवा सुरू झाली.

भारत यादव यांचा एसटी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर याला यश आले असून, मलकापूर आगारातून ही एसटी पुन्हा सुरू करण्यात आली. याचा आनंद व्यक्त करत बच्चे सावर्डे येथे एसटीचे ग्रामपंचायतीतर्फे स्वागत केले.

सकाळी एसटी गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने एसटीचे स्वागत केले. चालक दिलीप पाटील व वाहक दशरत घोसाळकर यांना फेटा बांधून ग्रामस्थांनी सत्कार केला. दरम्यान, कोरोना काळात बंद झालेल्या एसटीमुळे या मार्गावरील सुमारे २० हजार लोकांची गैरसोय होऊ लागली. विद्यार्थी, नोकरदार यांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. महिला बाजारासाठीही गावाबाहेर जाऊ शकत नव्हत्या. याची दखल घेत यादव यांनी वेळोवेळी एसटी प्रशासनाकडे एसटी पूर्ववत करण्याची मागणी केली. याची दखल घेत मलकापूर आगाराने या मार्गावर पुन्हा फेरी सुरू केली. या साठी आमदार डॉ विनरावजी कोरे सावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी मलकापूर डेपो, भारत यादव, व ग्रामपंचायत यांचे आभार मानले.

एकीकडे राज्य शासन महिलांचा प्रवास सुखकर होण्यासाठी महिला सन्मान योजना राबवत आहे. दुसरीकडे एसटीच गावात येत नसल्याने होणाऱ्या गैरसोयीकडे भारत यादव यांनी लक्ष वेधले. याची दखल घेत विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, मलकापूर आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे, सहायक वाहतूक अधीक्षक धनवडे, सहायक वाहतूक निरीक्षक प्रशांत लकेश्री यांच्या प्रयत्नातून एसटी पुन्हा सुरू झाली.

यावळी सरपंच बाळासाहेब पाटील, सदस्य वसंत यादव, बंडोपंत यादव.डॉ.अनिल सावंत,विण्णू मोरे, जयसिंग यादव, विजयसिंह बच्चे,सर्जेराव बच्चे,सुरज बच्चे,बाबासो संकपाळ, आनंदा निकम ग्रामपंचायत सदस्य सातवे, पत्रकार सुनिल पाटील, विद्यार्थी. विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.