Home कोल्हापूर जिल्हा संजीव चिकुर्डेकर छत्रपती शाहूराजे समता पुरस्काराने सन्मानित

संजीव चिकुर्डेकर छत्रपती शाहूराजे समता पुरस्काराने सन्मानित

संजीव चिकुर्डेकर छत्रपती शाहूराजे समता पुरस्काराने सन्मानित

 

 

कोल्हापुर,(प्रतिनिधी):- कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेबद्दल कालकथित माजी खासदार एस.के.दिगे मेमोरियल फाउंडेशन,कोल्हापूर या संस्थेमार्फत दिला जाणारा या वर्षीचा छत्रपती शाहूराजे समता पुरस्कार संजीव चिकुर्डेकर यांना महापौर निलोफर आजरेकर व शासनाचे शिक्षण संचालक महावीर माने यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळा शाहु स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडला.

संजीव चिकुर्डेकर हे 36 वर्षापासून एस.टी. महामंडळामध्ये कर्यरत असून गेली 28 वर्षापासून कामगार क्षेत्रात काम करीत आहेत.कामगारांना न्याय मिळावा या उद्देशाने प्रेरीत होऊन यांनी स्व.गोविंदराव आदिक ते कामगार नेते आमदार भाई जगताप तसेच नेते श्रीरंग बर्गे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस या राज्यस्तरीय संघटनेच्या माध्यमातून काम सुरु आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी चिकुर्डेकर यांनी अनेकदा प्रशासनाविरोधात निदर्शने,मोर्चे तसेच दोनवेळा 3-3 दिवसांची आमरण उपोषण आंदोलने यशस्वी करून कामगारांना न्याय मिळवून दिलेलाआहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत संजीव चिकुर्डेकर यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयांतीनिमित्त छत्रपती शाहूराजे समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी आनंददायी बाब असून यामुळे काम करण्यास निश्चितच प्रेरणा मिळत राहील अशी भावना संजीव चिकुर्डेकर यांनी व्यक्त केली.