मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे स्तुत्य उपक्रम समाजाला दिशा देण्याचे सामाजिक कार्य – रामदादा घाटगे
बडोदे, (प्रतिनिधी):- मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे यांच्या सुचनेनुसार माजलपुर येथे आयोजित भव्य मेळाव्यात ह भ प रामदादा घाटगे यांनी संघटनेच्या सामाजिक कामाचे हजारो समाज बांधव यांच्या साक्षीने कौतुक केले असे बोलताना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी बोलताना सांगितले.
या वेळी आपल्या भाषणात राज्य महिला अध्यक्षा सौ कल्पना सुर्वे यांनी सांगितले मराठा क्रांती स्वराज्य संघटना देश पातळीवर प्रचंड फोफावली आहे हजारो समाज बांधव तन मन धनाने संघटना वाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद देत अहोरात्र मेहनत घेत आहेत आज शेकडो विद्यार्थी गुण गौरव सन्मान सोहळा तसेच ज्येष्ठ समाजसेवक यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला त्या मागे सर्व बडोद्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत त्यांचा मोठा त्याग शेकडो सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र व रामदादा घाटगे महाराज यांचा आशीर्वाद आपणास लाभला आहे. सर्व उतिर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी सांगितले या भव्य दिव्य सोहळा संपन्न करण्यासाठी मराठा बांधवांची संघटित शक्ती परिवर्तन घडवत आहे. आज हजारो समाज बांधव मराठा क्रांती स्वराज्य संघटना झेंड्या खाली बडोद्यात एकवटली आहे अश्याच प्रकारे ११ राज्यात मोठ्या संख्येने समाज सामील होत पुढील वाटचालीस प्रेरणा देत आहे. अनेक सामाजिक बांधिलकी जोपासत भव्य दिव्य सोहळे आम्ही यशस्वी केले मात्र आजच्या मेलाव्याने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सदानंदराव भोसले व सहकाऱ्यांनी बडोदे येथे या संघटनेची स्थापना केली होती. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी सांगितले.
हा उपक्रम राबवण्यात गुजरात राज्य पदाधिकारी, युवा नेते महिला पदाधिकारी व शेकडो समाज बांधव यांच्या साक्षीने कौतुक सोहळा पार पडला असुन सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते याना आयोजक राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे यांनी सांगितले. गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे गुजरात राज्य युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते बडोदे शहर युवा अध्यक्ष करण पवार माजी महापौर निलेश राठोड माजी नगरसेविका छाया संभे बडोदे जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा गरुड, पिंपरी चिंचवड अध्यक्ष मंगेश चव्हाण पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्तात्रय गोडसे बडोदे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव धनावडे ओमकार माळी सौ मीरा प्रदीप मोरे युवा नेते पार्थ मोरे यांच्या सह शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फारच मेहनत घेतली या वेळी सर्व उपस्थित बंधु भगिनींना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.