आ.रामहरी रुपनवर यांच्या हस्ते डॉ.मीना श्रीवास्तव यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
सांगली,(प्रतिनिधी):- नुकताच आष्टा येथील मा.डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल सभागृह आष्टा ता.वाळवा जि.सांगली येथे संपन्न झालेल्या 2024 च्या ईगल फौंडेशनच्या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. याच गौरव सोहळ्यात डॉ.मीना प्रमेंद्र श्रीवास्तव यांच्या सामाजिक, वैद्यकीय आणि साहित्यिक क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेत त्यांचा ईगल फाउंडेशनच्या राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार 2024 या पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉक्टर मीना श्रीवास्तव यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून फार्माकॉलॉजी (औषध शास्त्र) विषयात एम डी केले आहे, तसेच समाजशास्त्र या विषयात एम ए देखील केले आहे. रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण देण्यात त्यांनी नागपूर येथील सरकारी महाविद्यालय आणि रुग्णालयात तसेच भारतातील विविध खाजगी वैद्यकीय संस्थांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. समाजजागृती आणि समाजप्रबोधन करण्याच्या दृष्टीने त्यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांत सुरु आहे. समाजमाध्यमातून आणि वर्तमानपत्रांतून ते प्रकाशित होत असते. त्यांनी रामायण महर्षी वाल्मिकी या विषयांवरील श्री विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या मराठी पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद केले आहेत. सदर 4 अनुवादित पुस्तकांच्या प्रती त्यांनी वरील सोहळ्याकरता मंचावर उपस्थित मान्यवरांना भेट म्हणून दिल्या. त्यांच्या या सामाजिक, वैद्यकीय आणि साहित्यिक उपक्रमांचा ईगल फौंडेशनने राष्ट्रीय पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे अशा विविध स्तरांतून भावना व्यक्त होत आहेत.