खंडोबा ग्रूप, जवाहर सलगर युवा शक्ती यांच्यावतीन वृक्षारोपण
पेठ वडगांव,(प्रतिनिधी):- निसर्गाचे संवर्धन होऊन मानवाचे स्वास्थ्य सदृढ राहावे, या उद्देशाने खंडोबा ग्रूप व जवाहर सलगर युवा शक्ती यांच्या सयुंक्ताने महालक्ष्मी मंदिर परिसरात सुमारे 60 हुन अधिक करंज,बदाम, तामण,जांभुळ,उंडी, बकुळ, वड ,कैलासपती यासारखी 15 फुट उंचीची झाडे 1 लाखाहून आधिक खर्च करून मंडळाच्या वतिने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.विद्या पोळ, माजी नगरसेवक गुरूप्रसाद यादव,पप्पू घारसे,जवाहर सलगर,सचिन पाटील ,सुरज जमादार,किशोर गुरव,पाडुंरग पोवार,विजय रेवणकर,विकी नायकवडी,रूतु पाडळकर,अकुंश कदम ,निलेश बागडे यांचेसह मंडळाचे सभासद उपस्थित होते.