Home Breaking News कुंभोज परिसरात 10 वीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव फटाक्याची आतशबाजी व गुलालाची...

कुंभोज परिसरात 10 वीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव फटाक्याची आतशबाजी व गुलालाची उधळण

कुंभोज परिसरात 10 वीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव फटाक्याची आतशबाजी व गुलालाची उधळण

 

 

कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकलंगले येथील एम जी शहा विद्या मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल हायस्कूल कुंभोज तसेच रयत शिक्षण संस्था कुंभोज यांचा दहावीचा SSC निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपला निकाल जाहीर होताच आपला आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शालेय शिक्षकांच्या बरोबर विद्यार्थी व पालखहि सहभागी झाली होते.

सर्वच परिसरातील निकालांमध्ये यावर्षीही मुलींनीच बाजी मारल्याने पालक वर्गातून आनंद व्यक्त होत होता. निकाल लागल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आताषबाजी करून आपला आनंद साजरा केला.

कुंभोज परिसरात सध्या एम.जी. शहा विद्यामंदिर, रयत शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल स्कूल कुंभोज या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या सर्व शिक्षण संस्थांचा निकाल शंभर टक्के लागला असून याबाबत पालक वर्गातून सर्व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी शिक्षक सेवक यांचे कौतुक व्यक्त होत आहे. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पालक वर्ग व शिक्षण संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपला वेगवेगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त केला.