Home शैक्षणिक टोप हायस्कूल टोप शाळेचा 10 वी सेमी माध्यमचा 100% तर मराठी माध्यमचा...

टोप हायस्कूल टोप शाळेचा 10 वी सेमी माध्यमचा 100% तर मराठी माध्यमचा 96.45% निकाल

टोप हायस्कूल टोप शाळेचा 10 वी सेमी माध्यमचा 100% तर मराठी माध्यमचा 96.45% निकाल

 

 

टोप, (प्रतिनिधी):-टोप ता.हातकणंगले येथील शिवराज एज्युकेशन सोसायटी संचलित टोप हायस्कूल टोप या शाळेचा एसएससी  SSC मार्च 2024 चा सेमी माध्यमचा  निकाल 100 टक्के तर मराठी माध्यमचा निकाल 96.45 टक्के इतका लागला लागला असून शाळेच्या कु.आर्या वरद दीक्षित या विद्यार्थिनींने 96.40 एवढे गुण मिळवून किणी केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला.

विद्यालयात गुणानुक्रमे पहिले पाच क्रमांक मुलींनी पटकावले असून आर्या वरद दीक्षित -96.40 , अश्विनी किरण सिसाळ -94.40, प्राची मनीष कांबळे-92.60

नेहा नेताजी चेचरे-91 ,श्रावणी विष्णू पाटील -91, श्रावणी मधुकर सुतार – 90.60 या मुली गुणानुक्रमे पहिल्या पाच क्रमांकावर राहिल्या आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष एम.टी. पाटील तसेच उपाध्यक्ष  गणेश पाटील .कार्याध्यक्ष दौलत पाटील सर्व शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले.